अळवावरचे पाणी


त्या कविसंमेलनात
मी माझी कविता वाचली
सहित्याच्या निर्माल्यात,
काही शब्दफुले वेचली

त्या भव्य सभागृहात,
तुरळक श्रोते आढळले
बरेचसे मरगळलेले,
तर काही निद्रिस्त वाटले

माझ्या शब्दबाणांनी
मी त्यांना चाळवले
काही चुळबुळले,
पण पुन्हा पेंगुळले

शब्दांचे मायाजाल
मी घट्ट विणले
माझ्या शब्दांचे आसूड
त्यांच्यावर बरसले

वळचणीचे पाणी
ओढ्यात मिसळले
झाडाचे पान मात्र
कोरडेच राहिले!!

Comments

Only few are interested in poetry others look at it as timepass. Anyway nice poem 👍

By :
20/04/2023 11 : 51 : 32 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article